करमाळा प्रतिनिधी
सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने उजनी जलाशय मायनसमध्ये गेल्याने करमाळा शहरात व जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. करमाळा शहरांमध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण दि. ३०/०३/२०२४ रोजी दु. २ वा. ३० मि. पासून करमाळा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगांव येथील पपिंग स्टेशन येथील पंपामध्ये कचरा

आडकल्यामुळे पंप नादुरुस्त झालेला आहे. त्यामुळे करमाळा शहरास तीन ते चार दिवस पाणी पुरवठा हा कमी दाबाने होत आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे सदर गोष्ट लक्षात आणून देवून ही अद्याप पर्यंत पंपामधील आडकलेली घाण, कचरा काढला नसल्यामुळे व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे करमाळा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे

शहरात दोन किंवा तीन दिवसाने पाणीपुरवठा होत आहे. तरी सदर पंपाची दुरुस्ती तातडीने करुन शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा.
तसेच करमाळा शहरात विविध प्रभागात करमाळा नगरपरिषदेने बोअरवेल (विंधन विहिर) घेतलेले आहेत. सदरचे बोअरवेल सद्यस्थितीत काही भागामध्ये कार्यरत आहेत तर काही भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत, सदर नादुरुस्त बोअरवेल मोटार

व रिबोअर करुन तात्काळ चालु नवीन पाण्याच्या टाक्या जोडून पाणी पुरवठा सुरळीत करा असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद, नगर परिषदेचे कर्मचारी पाणीपुरवठा विभाग कमलाकर भोज, विनोद राखुंडे करमाळा नगरपरिषद व ओ एस स्वप्नील भालेकर यांना भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांनी दिले आहे.

यावेळी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चेतन आलाट, संपर्कप्रमुख वासुदेव डोके, उमाकांत पाटील, रवीशेठ नाईक, प्रशांत शिंदे, अक्षय शेळके, सरचिटणीस अमोल महाडिक, मीडिया प्रमुख सिद्धेश लष्कर हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *