
करमाळा प्रतिनिधी
कुंकू गल्लीतील रहिवासी सुमित्रा प्रतापराव सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांचे पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रम सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचेवर आज संध्याकाळी सहा वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




