करमाळा प्रतिनिधी

संजय गावडे रा. गोयेगाव यांची केळी इराण येथे जात आहे.यांनी केळीची लागवड जैन कंपनीच्या नियोजना नुसार 4 एकरात केली होती. या लागवडीतून ४० ते ४५ किलो वजनाचे घड निघाले आहे एका फनिचे वजन ५ ते 6 किलो होत आहे.

जैन कंपनीची लागवड १५ मे २०२३ रोजी केली होती व काढणी ११ मार्चला सुरुवात केली असून त्यातून आजपर्यंत १०० टन माल निघाला आहे व अजून ४० ते ५० टन माल अपेक्षित आहे. सर्व खत औषधाचे मार्गदर्शन महालक्ष्मी कृषी केंद्र बारामतीचे सचिन सस्ते यांचे लाभले आहे. यातून २० ते २५ लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

हिंगणीचे सरपंच संतोष बाबर व अकोले गणपती येथील केळी व्यापारी आपल्या केळीची निर्यात इराण, दुबई येथे करत असल्याचे सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *