
करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांनी मागील पाच वर्षात कधीही शिवसेनेला सोबत घेवून काम केलेले नाही तसेच शिवसेनेची कधीही बैठक घेतली नाही अशा पध्दतीने शिवसेनेचा अपमान करणाऱ्या निंबाळकर यांचा उदो उदो

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करू नये असा सणसणाटी टोला यावेळी शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे यांनी चिवटे यांना लगावला. तसेच नगराध्यक्ष पदाला चिवटे उभे राहिले असताना आपल्याला जेमतेम 700 मते पडली आणि आपण

निंबाळकरांना एक लाखाचा लिड देवू असा शब्द कोणत्या तोंडाने देत आहात असा प्रश्नही यावेळी काळे यांनी उपस्थित केला. त्यामुळे निंबाळकर यांनीही निवडून यायचे असेल तर जनमाणसातल्या लोकांना सोबत ठेवा अशा फुकटच्या तोंडाच्या वाफा

काढणाऱ्यांना व 50 लाखांचे कामे जिल्हाप्रमुखांना देवून मतदान होईल असा गैरसमज निंबाळकर यांनी काढून टाकवा चिवटे यांना सोबत ठेवल्यास नक्कीच आपला पराजय होईल हे मी अनुभवाच्या बोलातून सांगतो आहे.

यावेळी काळे म्हणाले की, शिवसैनिक हा स्वाभिमानी व स्वतंत्र बाणा जोपासणारा कार्यकर्ता आहे. दोन पैशांसाठी स्वाभिमान गहान ठेवून लाचारी स्विकाराणारा हा शिवसैनिक असू शकत नाही. ज्या निंबाळकरांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना पाच वर्षात कधीही विचारणा केली नाही त्यांच्या उमेदवारीचे स्वागत जिल्हाप्रमुख महेश चिवटे कोणत्या अधिकारात करीत आहेत. वास्तविक पाहता चिवटे यांनी उमेदवारीचे स्वागत करण्याच्या आगोदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे बंधनकारक होते परंतु कोणालाही विचारात न घेता परस्पर पेपरबाजी करीत आहेत. सध्या करमाळयातील शिवसेनेतील ते संजय राऊत झालेले आहेत. दररोज स्वत:ची बातमी लावल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही.
कुर्डूवाडी येथे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी मांडलेल्या भूमिकेसोबत आम्ही सर्व पदाधिकारी असून जोपर्यंत निंबाळकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्व कामे करू असा ठोस शब्द देत नाहीत तो पर्यंत आम्ही निंबाळकरांचा प्रचार करणार नाही. तसेच सावंत सर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक शिवसैनिकाला युतीमध्ये मानाचे स्थान मिळाले पाहिजे. सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही युती धर्म पाळणारच आहे. परंतु चिवटे यांच्यासारखे पदाधिकाऱ्यांमुळे शिवसेनेला युतीमध्ये दुय्यम स्थान मिळत आहे. निंबाळकर यांनीही एक गोष्टीचा विचारा करावा फक्त चिवटे म्हणजे शिवसेना नाही. शिवसेनेचे इतर पदाधिकारी यांनी मागील वेळेस सुध्दा आपला तन मन धनाने प्रचार केला होता परंतु जर आपण प्रा. शिवाजी सावंत सर यांना डावलून चिवटेंना जवळ करून जर निवडणूक जिंकण्याचा मानस ठेवत असाल तर आपल्या भ्रमाचा भोपळा 04 जून 2024 रोजी म्हणजेच निकालाच्या दिवशी नक्कीच फुटेल त्यावेळी आपणाकडे पश्चातापाशिवाय हाती काही उरणार नसल्याचेही यावेळी शहरप्रमुख काळे यांनी सांगितले.