वाशिंबे प्रतिनिधी
उंदरगाव ता करमाळा येथील शेत गट नं. 82/2 अ मधील 00 हेक्टर 40 आर ही शेतजमिन वाशिंबे ता. करमाळा येथील डॉ.विक्रम विष्णू नाळे यांनी 14 जूलै 2023 ला इंदूमती टकले व महेश टकले यांच्या मालकीची शेतजमिन डाँ.नाळे यांनी घेतली होती. परंतू त्यानंतर काही दिवसातच सदर शेत जमिन परस्पर मुलींना बक्षिस पत्र करुन सात बारा उताऱ्यावर नोंद करुन घेतली. त्यामुळे त्यांची या व्यवहारात 38 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उंदरगाव येथे घडली आहे.

याबाबत डॉ. नाळे यांनी बोलताना सांगितले की इंदूमती टकले, महेश टकले रा. उंदरगाव ता करमाळा यांनी त्यांच्या मालकीची ४० गूंठे जमिन विक्रीस काढली. जमिनीचा व्यवहार माझ्याशी करुन ठरलेली रक्कम स्वीकारुन खरेदी दस्तऐवज ही नोंदवला.
सदर मिळकत मी वहिवाटण्यास चालू केली असता जमिन वहीवाटीस अडथळा दिला.

या व्यवहारात माझी आर्थिक फसवणुक झाली आहे समजताच याबाबत प्रथम करमाळा पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंद केली. मात्र सदरचा व्यवहार हा दिवानी स्वरुपाचा असल्याचे कारण समोर करून पोलिसांनी कुठलिही कारवाई केली नाही. त्यानंतर दि. 2 डिसेंबर 2023 रोजी उपविभागीय कार्यालय कुर्डूवाडी यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार उपविभागीय

अधिकारी यांसमोर वकीला मार्फत नोटीस बजावून महेश टकले व इंदूमती टकले, सोनाली मोहोळकर यांना सुनावणी साठी हजर राहण्यास सांगितले. परंतू एका ही तारखेला हजर झाले नाहीत. उलट सुनावणी कालावधीत 25 गुंठे जमिनीचे मुलींच्या नावे बक्षिस पत्र करुन सात बारा उताऱ्यावर तलाठी व मंडल अधिकारी यांच्या कडून नोंद करून घेतली. याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक करमाळा यांकडे संबधित महसूल प्रशासनाने यावर तातडीने आदेश देऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा करमाळा तहसीलदार कार्यालय समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे डाँ.नाळे यांनी सांगितले

………………….
उंदरगाव ता करमाळा येथील 82/2 अ मधील 40 गुंठे जमिनीची खरेदी घेतली. याची नोंद सात बारा उताऱ्यावर करण्यासाठी गाव कामगार तलाठी यांच्या कडे अर्ज केला. परंतु त्यांनी नोंद नामंजूर केली. नोंद लावण्यासाठी मंडल अधिकारी यांच्या कडे विनंती केली होती. त्यांतर सदर व्यक्तीने याच जमिनीचे मुलींच्या नावे बक्षिस पत्र करुन दिले. या बक्षिस पत्राची नोंद गाव कामगार तलाठी यांनी सात बारा उताऱ्यावर लावून घेतली. त्यामुळे गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांची भूमिका संशयास्पद आहे. याची तातडीने चौकशी व्हावी.
डाॅ. विक्रम नाळे, वाशिंबे ता करमाळा
……………………
अर्धन्यायीक प्रकरणामध्ये उपोषण करता येत नाही. हा एक प्रकारचा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. फाईल बघितल्याशिवाय या प्रकरणावर मी लगेच बोलू शकत नाही. माझ्याकडे पन्नास हून अधिक प्रकरणे चालू आहेत. याबाबत योग्य ती पडताळणी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
प्रियंका आंबेकर, उपविभागीय अधिकारी कुर्डुवाडी.