करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायत मध्ये सध्या अनागोंदी कारभार चालू आहे लवकरच प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास शिंदे यांनी केले आहे.

पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून  पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. ग्रामपंचायत पाणी नसताना देखील कचऱ्या कुंड्याचे काम एका दिवसात करून घेतले आहे. शोष खंड्याचे काम एका दिवसात करुण घेतले आहे. सिमेंट काँक्रेट

रस्ता हा दोन दिवसांमध्ये काँक्रेट टाकून पूर्ण तयार केलेला आहे. या सर्व कामांमध्ये गोड बंगाल असल्याचे दिसून येत आहे तरी त्याच कामाची लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. गावाला पिण्यासाठी पाणी नसताना

देखील काँक्रीट रस्ता कसा करण्यात आला व तो कुठल्या पद्धतीचा करण्यात आला याची चौकशी लवकरात लवकर करावी  या ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपलेले असून या ग्रामपंचायत वर लवकरात लवकर प्रशासक नेमणूक करून गावाला न्याय

द्यावा . शासनाने गावातील पाण्यासाठी पेयजल योजना ही 75 लाख रुपयांची दिली असताना देखील या योजनेची सदर ग्रामपंचायत बॉडीने व ग्रामसेवक यांनी मिळून वाट लावलेली दिसून येत आहे. योजना ही चार वर्षापासून धुळखात पडलेली आहे त्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी एक बोर दोनशे फूट घेतला असताना तो पूर्ण कोरडा गेल्यानंतर गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्गणी करून तो बोर चारशे फुटापर्यंत नेल्याने सध्या थोडा पाण्याचा प्रश्न मिटलेला दिसत असताना देखील गावातील काही  नेतेमंडळे श्रेय वादासाठी धडपडत आहेत. भाळवणीतील बॉडीची मुदत पूर्ण संपलेले असून शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून प्रशासकाची नेमणूक करावी व गावाला योग्य तो न्याय द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रामदास शिंदे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *