करमाळा प्रतिनिधी

भारतीय लोक सभेची अठरावी निवडणूक एकदम तोंडावर आली आहे. देशाच्या अनेक खेडयातुन मोठ-मोठ्या शहरातून लोकसभेच्या निवडणूकीचे वारे वाहु लागले आहे. सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते कामाला लागले आहेत. नेहमी प्रमाणे लोकांना

खैरातीची उधळण सुरु होईल. सत्ताधारी पक्षांनी ती खैरात अगोदरच या ना त्या स्वरूपात देण्याचे सोंग अवलंबिलेली दिसते आहे. माध्यमा मधुन बेछूट जाहिरातीचा वर्षाव चालू आहे. वास्तव परिस्थिती पडताळूण पाहिली तर जाहिरातीचा काहीच संबंध दिसत नाही. माध्यमांना त्यांचा टी.आर.पी एफ.टिकवुन ठेवायचा आहे.

पत्रकारिता ही आपली नैतीक जबाबदारी आहे हे सर्वजन विसरले आहे. म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे भविष्यातील थुसर होऊ घातलेल्या वाटांचं कोणालाच काही कस वाटत नाही.

आपण आपला प्रतिनीधी निवडूण देतो.त्यानी पाच वर्ष समाजासाठी लेखा-जोखा कोण मांडणार ?  पाच वर्षातुन लोकांसमोर एकदा जायच त्याना चिरीमिरी दयायची किंवा अश्वासने दयाची. मात्र या भागातील समाजाचे काय काय प्रश्न त्या भागातील नागरिकांना कोण-कोणत्या अडचणीना सामोरे जावे लागते हे या प्रतिनिधीच्या गावी नसते. त्यातुन असेही लक्षात येते की एकदा घराणेशाही उमेदवार उभा राहिला तर तो पुढे पिढ्यान पिढ्या लोकाचं प्रतिनिधित्व करत असतो.

मुलभूत गरजा पाण्याचा प्रश्न शेतकर्‍यांच्या पिकाला भाव नाही, उच्च शिक्षणाचे प्रश्नही सोडवु शकलेला नाही. कारण हा निवडून गेलेला खासदार पुढे अफाट माया जमवतो. त्यातुन गुंडगिरी, एकाधिकारशाही जन्माला येते. काटेरी रोपटे तोडुण काढणे जसे कठिण होते तसे आपल्याकडे सध्या झाले आहे. नेहमीचा चेहरा बदलने फार गरजेचे झालेले आहे. निवडणुकीतील चेहरे आपल्याला बदलता आले तर देश बदलायला वेळ लागणार नाही. नवे चेहऱ्यानी पुढे आले पाहिजे.

लोक समुहाने त्याला स्विकारायला पाहिजे ही काळाची नव्हे देशाची गरज आहे. पैसा मोजून निवडणुक लढविणारा माणूस हा बाजारी दलाल असतो हे भारतीय मानसिकतेला अजुनही पटत नाही ही देशाची शोकांतिका आहे. देशाची अर्थीक परिस्थिती किती हातघाईवर आलीय हे सांगायला आता अर्थशास्त्रज्ञाची गरज नाही.

करमाळ्यामधुन अमित अल्हाट नावाचा एक तरुण मला भेटला त्यांनी करमाळ्यामधुन लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले. मला काहिस अचंबित झाल्यासारखे वाटले परंतु या भागातील प्रश्नची जाणिव व कार्यकरण्याची त्यांची जिद्ध पाहिली तर तुम्हालाही वाटेल काय हरकत आहे नव्या चेह-यांना संधी दयायला. देशातील अशा अनेक तरुणांनी निवडणुका लढाव्यात. प्रयत्न करायला हरकत नाही. समाज प्रश्नांची चाढ ज्या मनात कळकळ जाणवते तो माणूस लढल्या शिवाय राहणार नाही चोहोबाजूंनी अंधारलेल्या काळोखात गारगोटीच्या मदतीने चकमक करून प्रकाश आणु पाहणाऱ्या त्या अमित अल्हाट नावाच्या मित्राला आपण सगळयानी मनापासु शुभेच्छा देऊयात. पाठीवर थाप मारण्याची हीच वेळ आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *