
करमाळा प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रदेश अध्यक्ष डॉ. नीलेश भाऊ विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक इंद्रजीत घाटे यांच्या आदेशानुसार

वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात येणार आहे. मेळावा आयोजित करत असताना कार्यकर्ते पदाधिकारी वंचित घटकांना बरोबर घेऊन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट

करण्यासाठी ताकत दाखवुन देण्याची गरज आहे. हा मेळावा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे व जिल्हा अध्यक्ष पांडुरंग कांडेकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सोलापूर जिल्हा मेळावा करमाळा येथे आयोजित करण्यात येणार आहे. तारीख लवकरच

जाहीर करण्यात येईल. असे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन सरवदे, जिल्हा महासचिव प्रविण आण्णा वाघमारे, उपस्थित सर्व 11 तालुक्यातील अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी यांना सांगितले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ काका घार्गे, देशमुख,

युवा जिल्हा उपाध्यक्ष समर्थ आखाडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत फुगे (माळी), जहांगीर काझी, माढा तालुका अध्यक्ष राजाराम लोंढे, महासचिव आकाश साळवे, करमाळा तालुका अध्यक्ष जनार्दन उबाळे, तालुका उपाध्यक्ष संभाजी कांबळे, प्रसिद्धी

प्रमुख गणेश उबाळे, माळशिरस तालुकाध्यक्ष सुदर्शन सुरवसे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष मोहन लोंढे, कुर्डूवाडी शहर महासचिव रवी पाटोळे, युवा तालुका सदस्य सोमनाथ लोंढे, अनिकेत वाघमारे, नागेश घाडगे, जिल्हय़ातील सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मीटिंग साठी उपस्थित होते.