
करमाळा प्रतिनिधी
धनगर शक्ती मीडिया समूहाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना प्रोत्साहनपर धनगर शक्ती मीडिया समूहाच्या वतीने राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील गुणगौरव उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.

सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आम्ही धनगर शक्ती मीडिया समूहाच्या वतीने आपल्या कार्यास गौरव व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आमच्या धनगर शक्ती च्या वतीने २०२४ करिता राज्यस्तरीय सामाजिक उत्कृष्ट पुरस्कार जाहीर करीत आहोत.

आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संपादक धनगर शक्ती आकाश पुजारी यांनी निवडीचे पत्र देऊन कळविले आहे.

