
करमाळा प्रतिनिधी
रेटेवाडी उपसा सिंचन मंजूर केली नाही तर आता मते मागायला येऊ नका बहिष्कार कायम
आज रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची अत्यंत महत्त्वाचे अशी बैठक करमाळा शहरांमध्ये पार पडली सदर बैठकीमध्ये

कित्येक महिन्यापासून सदर योजनेच्या मंजुरीसाठी बहिष्कारच अस्त्र चाळीसगावातील शेतकऱ्यांनी दिले असताना सुद्धा सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली अशा प्रकारची तीव्र भावना उपस्थित संघर्ष समितीच्या सदस्य व शेतकरी

बांधवांनी व्यक्त केली कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीवर मतदान करता बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी निर्धार व्यक्त केला. चार दिवसापूर्वी मागणी केलेला पूल प्रशासकीय मंजुरी मिळेल

त्याची निविदा निघून 395 कोटी मार्गी लागत असेल तर रिटेवाडी साठी फक्त 380 कोटीची गरज होती व ही मागणी गेल्या पाच सात वर्षापासून जोरदार असतानाही राज्यकर्ते जर दुर्लक्ष करत असतील तर आम्हीही मतदान न करता तुम्हाला तुमची

जागा दाखवून देऊ अशा प्रकारच्या तीव्र भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या त्यावेळी चाळीस गावातील सर्व सरपंच रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.
