मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुषग्राम जिंती येथे कार्यक्रम
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुषग्राम जिंती आयोजीत व करमाळा मेडिकोज गिल्ड यांच्या सहकार्याने भव्य आयुष आयर्वेद होमियोपॅथी व योग निदान व उपचार शिबीर

तसेच महिला आरोग्य जनजागृती मेळावा व प्रोजेक्ट निदान हया मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतील उपक्रम अंतर्ग स्तनांचा कर्करोग तपासणी शिबीर चे आयोजन दिनांक २२ मार्च २०२४ वार – शुक्रवार आयुष्मान

आरोग्य मंदिर (आयुष) आयुर्वेद दवाखाना धन्वंतरी पथ जिंती ता. करमाळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मणिपा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सदर शिबीरामध्ये आयुर्वेद तज्ञ अग्निकर्म तज्ञ

रक्तमोक्षण तज्ञ होमियोपॅथी तज्ञ योग तज्ञ कान, नाक, घसा तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत चिकित्सा, इत्यादी सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. तसेच शिबीरामध्ये आयुप आरोग्य विषयक भारूड आयोजित करण्यात आले आहे. महिलांसाठी

महिलांचे योग रजोनिवत्ती मध्ये घ्यावयाची काळजी अतिजोखमीच्या गरोदरमाता जीवंध्यत्व व त्यावरील उपचार महिला आरोग्य समुपदेशनया विषयांवर तज्ञ डॉक्टरांचे व्याख्याने आयोजीत करण्यात आली आहेत. पुणे विभागामधून जिंती ची निवड आयुषग्राम योजना साठी झालेली असुन हया आयुषग्राम योजनेअंतर्गत सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद व योग शास्त्राचा दैनंदिन जीवनामध्ये असणारी उपयोगिता व आयुप चिकित्सा पध्दतीचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणात होण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आयुर्वेद पोहचन्यासाठी सदर शिबिराचे आयोजन केले आहे तर जिंती व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी हया आयुष शिबीराचा निरोगी आयुष्य जगन्यासाठी हया शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मणिषा आव्हाळे यांनी केले आहे. जिल्हा आयुप अधिकारी डॉ. विलास सरवदे यांच्या निर्देशानुसार जिंती येथे दवाखान्यामध्ये दररोज योग सञ चालू असून या दैनंदिन योग सञाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबीरासाठी अध्यक्ष्य म्हणुन मणिषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिपद सोलापूर हया उपस्थित राहणार असुन प्रमुख उपस्थिती डॉ. संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सुहास माने जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. श्रीकांत कुलकर्णी निवासी वैदयकिय अधिकारी, डॉ. अनिरूध्द पिंपळे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, मनोज राऊत गटविकास अधिकारी, डॉ. कोमल शिर्के तालुका आरोग्य अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती डॉ. बाबासाहेब गाढवे वैदयकिय अधिकारी आयुर्वेद दवाखाना जिंती यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *