करमाळा प्रतिनिधी

रावगाव परिसरातील शेतकरी नागरिकांना आवश्यक असा विजपुरवठा मिळत नव्हता आता त्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

मौजे – रावगांव ता.करमाळा येथे आज ३३/११ के.व्ही.सबस्टेशनचे भूमीपूजन व विविध विकासकामांचे भूमिपूजन/ उद्घघाटन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन साठी निधी आणला आहे. कुकडी परिसरातील

शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मी मिळून दिला आहे. कुकडीचे पाण्याचेही नियोजन केले आहे. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत आवश्यक ते मंत्रालय पातळीवरून पाठपुरावा चालू आहे. भविष्यातील रस्ते वीज पाणी आदी समस्यांबाबत थोडीफार विषय मार्गी लावले आहेत राहिलेले काही तांत्रिक अडचणी आहे. त्याही लवकर सोडवण्यात येतील असेही अखेर आमदार शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले,रावगावचे माजी सरपंच दादासाहेब जाधव, राजेंद्र बाबर, राहुल सावंत,बुधवंत सर,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रा.पं.सदस्य,मा.अनिल पवार होते तसेच सतीशबापू शेळके, ॲड.राहुल सावंत,विवेक आण्णा येवले,बापूराव गायकवाड,शंकर जाधव,सुजीततात्या बागल,भोसे गावचे सरपंच भोजराज सुरवसे,राजेंद्र बाबर,दत्ता अडसूळ, निलाताई कांबळे,बोरगांवचे सरपंच श्रीराम भोगल,भाऊसाहेब काळे,मधुकर काळे,रघुनाथ काळे, देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड,वाशिंबे गावचे माजी सरपंच प्रताप झोळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक गायकवाड,

उपाध्यक्ष अशपाक जमादार,वीट गावचे माजी सरपंच उदय ढेरे,बापू तांबे,विकास आबा गोंदकर, महावितरणचे उपअभियंता सुनिल पवार, तसेच कार्यक्रमाचे संयोजक व माजी सरपंच मा.दादासाहेब जाधव,लिंबेवाडी गावचे सरपंच किरण फुंदे, वंजारवाडी गावचे सरपंच प्रविण बिनवडे, राखवाडीचे माजी सरपंच ब्रम्हदेव राख, बाळासाहेब पाटील, शहाजी सुरवसे, भाऊसाहेब बुधवंत, लक्ष्मण फुंदे, सुदाम शेळके, अंकुश काळे, अशोक बुधवंत, विनोद कानडे, रफीक शेख, आयुब शेख, महादेव पवार, हिरालाल

पवार, पिंटू पवार, संजय मोरे, संभाजी शेळके, रमेश जाधव, त्रिंबक केकान, महादेव फुंदे, अरुण केकान, दादा पाटील, सचिन बरडे, प्रकाश बुधवंत, आश्रु बुधवंत, हंबीरराव बुधवंत, नवनाथ बुधवंत, महादेव शेळके, महादेव धगाटे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित बागल यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण फुंदे यांनी मानले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *