
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर या कारखान्याच्या गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये गाळप केलेल्या ऊस उत्पादक व पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट देणे बाकी होते. ऊस उत्पादक व पुरवठादार


शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रकमा देणेसाठी साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कारखान्याविरुदध आरआरसी कारवाई केलेली होती. सदर आरआरसी आदेशास अनुसरुन तहसिलदार, करमाळा यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे आदेशान्वये

दि. २०/१०/२०२३ रोजी कारखान्याची एकुण ५,७२५ क्वि. साखर जप्त करुन विक्री केलेली होती. सदर साखर विक्री करतेवेळी साखर विक्री करण्यांत आलेले व्यापारी मे. आनंद ट्रडर्स, यवत यांनी दि. ३०/११/२०२३ रोजीच्या पत्रान्वये तहसिलदार,

करमाळा यांना साखरेमध्ये ५१५ क्वि. साखर कमी आल्याचे कळविलेले आहे. तर तहसिलदार, करमाळा यांनी दि. २६/१२/२०२३ च्या पत्रान्वये कारखान्यास साखरेमध्ये ५१५ क्वि. साखर कमी आल्याचे कळविलेले आहे.

कारखान्यामध्ये सदरप्रमाणे साखर विक्री करतेवेळी उपरोक्त नमुद केलेप्रमाणे कारखान्याच्या साखर साठयामध्ये कमी आढळून आलेल्या एकुण ५१५ क्वि. साखरेच्या अनुषंगाने कारखान्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे कारखान्याच्या

साखर साठयामधील कारखान्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे. कारखान्याचे झालेले आर्थिक नुकसान भरुन येण्याच्या दृष्टीने तसेच त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तिंच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यांत
येवून त्यांचेविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करणेत यावी. जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तिची नावे फायनान्स मॅनेजर तथा प्र. कार्यकारी संचालक अरुण बागनवर, मुख्य रसायन तज्ञ (चीफ केमिस्ट) अशोक खाडे, सि. क्लार्क / गोडावून

किपर कांतीलाल सरोदे, साखर गोडावून हमाली ठेकेदार रामदास शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक करमाळा यांना श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासकीय मंडळ सदस्य संजय गुटाळ यांनी केला आहे.