
करमाळा प्रतिनिधी
युवा मतदारांना नाव नोंदणीस प्रवृत्त करण्यासाठी गणेश करे पाटील यांच्यासह पाच जणांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये २४४ मतदारसंघातील करमाळा मतदारांना नवीन नाव नोंदणीचे आवाहन करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी केले आहे.

ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे. त्यांनी निवडणूक मतदान अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी किंवा शिक्षक यांच्याकडे युवा मतदारांनी नाव नोंदणी करावी असे यावेळी बोलताना गणेश करे पाटील म्हणाले, येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक जाहीर होत आहे. या अनुषंगाने सर्वच करमाळा तालुक्यातील मतदारांनी नोंदणी करावी असे मत व्यक्त केले.





