करमाळा प्रतिनिधी

बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल व दिग्विजय बागल यांनी आज आपल्या समर्थकांसह मुंबई येथे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष

चेतनसिंह केदार सावंत, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल, मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश

भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे मा. चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, आदिनाथ कारखान्याचे मा. व्हाइस चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ, करमाळा कृषी उत्पन्न

बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी जगताप, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड, मकाई कारखान्याचे संचालक अनिल अनारसे, पुण्याचे विष्णू गर्जे,कलीम काझी सर, व्यापारी

रितेश कटारिया, पोथरेचे नानासाहेब शिंदे, करमाळ्यातील आनंदराव कांबळे व विकास भोसले यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *