करमाळा प्रतिनिधी
विविध सामाजिक उपक्रम स्वयंप्रेरणेतून राबवून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शहरातील “क्षितिज ग्रुप” या महिलांच्या असणाऱ्या ग्रुपमधील सदस्यांची माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी ग्रुपच्या सदस्या डॉ.सुनीता दोशी, नलिनी जाधव, गीता कापडी यांनी ग्रुपमार्फत गेल्या दहा-अकरा वर्षांपासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि हे उपक्रम कुठलीही लोकवर्गणी, अनुदान न घेता फक्त ग्रुप
सदस्यांच्या सहभागातून राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना खा.निंबाळकर यांनी क्षितिज ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेची प्रशंसा करून खासदार व तुमचा भाऊ या नात्याने तुमच्या सामाजिक उपक्रमांसाठी तुम्ही सांगाल
त्या वेळी आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले. ग्रुपच्या वतीने यावेळी खा.निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपच्या माधुरी साखरे, पुष्पाताई फंड, सुप्रिया येवले, नीलिमा पुंडे, कावेरी देशमुख, माधुरी परदेशी, स्वाती माने, मंजू
देवी, उज्वला देवी, सुलभा पाटील तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, भाज युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे आदी उपस्थित होते.