करमाळा प्रतिनिधी

आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा शहरातील महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक बहुल योजनेतून करमाळा शहरातील विविध ठिकाणी 49 लाख रुपये मंजूर केले असून यामध्ये मौलानी माळ येथील इदगाह मैदान सुशोभित करण्यासाठी 15 लाख रुपये, मौहल्ला गल्ली येथील सभा मंडपासाठी दहा लाख रुपये, मुलाणवाडा येथील दफनभूमी कंपाउंड बांधणे व रस्ता काँक्रीट

करणे दहा लाख रुपये, आनंद बाग शेजारील सुलेमानी मज्जित समोरील रस्ता काँग्रेस काँक्रिटीकरण करणे सात लाख करमाळा शहर घरासमोर काँक्रिटीकरण करणे व पेविंग ब्लॉक बसवणे सात लाख सात लाख रुपये असे एकूण 49 लाख रुपयांची कामे आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा शहरात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे

जिल्हा उपाध्यक्ष तथा बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अशपाक जमादार यांनी ही माहिती दिली. तसेच करमाळा ग्रामीण मधील पश्चिम सोगाव,केम,कंदर,साडे,वडगाव, पुनवर,गुळसडी,वाशिंबे,आवाटी,दिवेगव्हाण कामोणे,जातेगाव,उमरड,रायगाव या गावासाठी एकुण दोन कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर केले आहे.

यापुढील काळातही आमदार शिंदे यांच्या माध्यमातुन अल्पसंख्यांकांच्या समाजाच्या सर्व समस्या व मागण्या सोडवून घेण्यासाठी तत्परतेने करुन घेऊ असे शेवटी जमादार यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *