करमाळा प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या प्रयत्नातुन व मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रफुल शिंदे यांनी आपले कार्यसम्राट खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार निधीतुन किल्ला विभाग येथे
दोन ठिकाणी LED दिवे मंजूर करून आणले या बद्दल किल्ला विभाग येथील आनंदाचे वातावरण आहे. या बद्दल किल्ला विभाग येथील जनते कडून खासदार यांचा भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी त्या LED दिव्याचे उदघाटन रणजितसिंह नाईक निबाळकर यांच्या हातून झाले.
यावेळी उपस्थित युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंभूराजे जगताप, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, तालुका अध्यक्ष चंद्रकांत राखूडे, शहर अध्यक्ष प्रफुल शिंदे, सरपंच देवीचामाळ योगेश सोरटे, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस ओंकार घोंगडे,
युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष वनराज घोलप, प्रशांत पवार, मारुती मंदिर चे पुजारी सचिन काळे गुरव, रोहित काळे गुरव, करण काळे, प्रशांत शिंदे, अक्षय शेळके, वासुदेव डोके, बबलू पठाण, डोके, शुभम राऊत, आदी सर्व उपस्थित होते.