करमाळा प्रतिनिधी

 आज देशात ईडी, सीबीआय यांची भीती दाखवून भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय करमाळा तालुक्यातील जनतेला येत आहे. आमच्या पक्षात या मगच तुमचं काम करतो म्हणून तालुक्यातील प्रमुख नेत्यांना

वरिष्ठ लोक प्रयत्न करत आहेत. जे नियमाने होत असेल ते न करता   तुम्ही आमच्या पक्षात येत असाल तर काम करतो असा दम देऊन पक्ष वाढत नसतो असा स्पष्ट विचार (उद्धव ठाकरे) शिवसेनेचे करमाळा शहर प्रमुख संजय शिंदे यांनी म्हटले आहे.

तालुक्यातील बऱ्याच नेत्यांना  ईडीच्या नोटिसा पाठवून शांत केले असा प्रयत्न करून भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू शकत नाही. गेल्या माढा लोकसभेत  याचा प्रयत्न झाला होता व करमाळा मतदारसंघातुन

शिवसेनेच्या मा. खा. कल्पना नरहिरे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी ही तालुक्यातील सर्व नेते एकत्र आले होते. हे तालुक्यातील मतदारांना सहन झाले नव्हते. आता ही ती वेळ आली आहे. अशीही आठवण तालुक्यातील हुशार मतदारांना

यावेळी करून दिली आहे. आजच्या परिस्थितीत राज्यात पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा पक्ष कसा चोरून घेतला तशाच प्रकारे शरद पवार यांचाही पक्ष बळजबरीने घेतला हे सर्वसृत आहे. हेही सर्वसामान्य मतदारांना माहिती आहे. यामुळे यापाठीमागे कुठली शक्ती काम करते आहे लोकांना माहिती आहे असेही शेवटी म्हटले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *