
करमाळा प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य अनिस बागवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूलच्या छोट्या चिमुकल्यांनी यावेळी विविध गीते सादर केली.

एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या जिज्ञासा व समता पाक्षिकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धांमधून यश संपादन केलेल्या विद्यार्थांना बक्षिस आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन जाधव एम. पी. यांनी केले तर आभार नवले यांनी व्यक्त केले.
यावेळेस पर्यवेक्षक प्रा.बी.के.पाटील, पर्यवेक्षिका नवले मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.विजय पवार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

