
करमाळा प्रतिनिधी
कुंभारवाडा जवळील खंदका जवळील पुलाच्या उत्तरेकडील दक्षिण भागाकडील सरकारी मोकळ्या जागेवर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सीमा रामदास कुंभार व त्यांचे पती रामदास कुंभार मुलगा डॉक्टर रोहन कुंभार व मनोज कुमार यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून सरकारी झाडे तोडली असून सदर जागेवर अतिक्रमण केले असून आता सध्या सदर



बिहारी युवकांना सदर जागा भाडे तत्वावर असून सदर बाबत मी वेळोवेळी तक्रारी अर्ज दिला असताना नगरपरिषद कर्मचारी कानाडोळा करून सदर अतिक्रमणास खतपाणी घालत असल्याचे दिसते व काही कर्मचाऱ्यांना त्यांनी पैसे दिल्याचे चर्चा आहे.

सरकारी नगरपरिषद जागेवर अनधिकृत झालेल्या अतिक्रमण त्वरित काढून सदर जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन तेथे व्यापारी गाळे काढावेत त्यापासून नपोस उत्पन्न मिळेल व न. प. च्या उत्पन्नात भर पडेल आपण अतिक्रमण जागा ताब्यात न घेतल्यास या या 26 जानेवारी २०२४ रोजी करमाळा नगरपालिकेसमोर आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी व होणारे जीवितहानी व नगरपरिषदेच्या नुकसानीस आपण जबाबदार राहतात ही विनंती.

…………
अतिक्रमण करणाऱ्या संबंधित व्यक्तींना नोटीस बजावली आहे – बालाजी लोंढे (मुख्याधिकारी नगरपालिका, करमाळा)
…..
या संदर्भात डॉ. कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क झाला नाही.
