
करमाळा प्रतिनिधी
“एकही नारा एक ही नाम जय श्रीराम”, जय श्रीरामच्या घोषणा देत करमाळा शहरात मंगल अक्षदा कलश यात्रा काढण्यात आली होती. यामध्ये शेकडो राम भक्त सहभागी झाले होते. अयोध्येत प्रभू राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच करमाळा

शहरातील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा या पार्श्वभूमीवर शहरातील सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम ट्रस्ट, भाजपा सर्वांच्या सहकार्याने आयोजन करण्यात

आले होते. किल्ला वेस हनुमान मंदिरापासून कलश यात्रेची सुरुवात झाली होती शहरातील प्रमुख मार्गावरून मंगल कलश घेऊन महिला त्या पाठोपाठ श्रीरामाचे रथयात्रा मूर्ती घेऊन रथयात्रा काढण्यात आली होती. चौकाचौकात विविध नागरिकांनी

श्रीराम रथावर पुष्पवृष्टी केली होती. यात्रेत विविध समाजातील नागरिक, लहान मुले, महिला, राम भक्तांनी सहभाग घेतला होता. लहान बालक प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, सिता यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते. प्रथम वेताळ पेठ येथील श्रीराम मंदिरात विधिवत आठ जोडप्यांच्या हस्ते पुजा करण्यात आली होती. मंदिर परिसर भक्तीमय झाला होता.
