
लताबाई जाधव यांना मुख्यमंत्र्याकडून एक लाखाची मदत,कर्करोग शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा
करमाळा प्रतिनिधी
पोथरे तालुका करमाळा येथील लताबाई दिगंबर जाधव त्यांना कर्करोग शस्त्रक्रिया करण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल पुणे येथे

दाखल करण्यात आले होते. परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांनी आर्थिक मदत साठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाकडे अर्ज केला होता. या अर्जाचा पाठपुरावा वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष समन्वयक शिवकुमार चिवटे, दीपक राव पाटणे, नागेश शेंडगे, आरोग्य शहर संघटक स्नेहल कटारिया यांनी प्रयत्न केले होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी त्याची दखल घेऊन तात्काळ त्यांना एक लाख रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम गॅलेक्सी हॉस्पिटल पुणे यांच्या खात्यावर जमा झाली असून त्यांच्यावर पुढील शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

……
अनाथांचा नाथ एकनाथ
या म्हणीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरगरिबांना मदत करत असून असा मुख्यमंत्रीच कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या गादीवर बसला पाहिजे असे मत लताबाई दिगंबर जाधव यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी पोथरे येथील शनीदेवताला अभिषेक करणार असल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले.
