साहेब आमच्या फाईलला इनवर्ड नंबर द्या – शिक्षक भारती संघटनेची मागणी.
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागात जिल्ह्यातील अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अनेक प्रकारच्या फाईल जमा करत असतात. या फाईल जमा करत असताना आवक शाखेतील कर्मचाऱ्याने त्या फाईल वर आवक

नंबर टाकून पोहोच देणे आवश्यक आहे. आवक नंबर सह पोहोच देणे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 5 नुसार बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून आवक नंबर टाकून पोहोच दिली जात

नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी अनेक वेळा हेलपाटे घालावे लागतात व शेवटी तुमची फाईल सापडत नाही अशी उत्तरे ऐकावी लागतात. जर संबंधित विभागाकडून आवक नंबर टाकून पोहोच दिली तर ती फाईल जपून ठेवण्याची

जबाबदारी संबंधित विभागाची असते शिवाय लोकसेवा अधिनियम कायद्यानुसार सदर काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावी लागते. त्यामुळे शिक्षण विभागात नंबर देण्याचे टाळले जाते व कर्मचाऱ्यांना वेठीस धरून आर्थिक देवाणघेवाण करण्यास भाग

पाडले जाते. शिक्षक भारती ने केलेली ही मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्य केल्यास व शिक्षण विभागास आवक नंबर देण्याविषयी सूचना केल्यास जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 80 टक्के मानसिक व आर्थिक त्रास कमी

होऊ शकतो. प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता येऊ शकते. हे निवेदन शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. या निवेदनावर विजयकुमार गुंड, देवदत्त मेटकरी व शरद पवार यांची स्वाक्षरी आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *