
आदिनाथ साखर कारखान्यास सहकार्य करणार – आ. रणजितसिंह मोहिते पाटील
करमाळा अकलूज
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. आपल्याला राजकीय विषय काही घ्यायचा नाही फक्त आदिनाथ मंदिर वाचवायचे आहे. सर्व ते सहकार्य करणार असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे दिली.

यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप,माजी आमदार नारायण पाटील,बागल गटाचे विलासराव घुमरे, सविताराजे भोसले, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना अडचणीत आहे, 230 कोटी कर्ज आहे, याबाबत सर्व तालुक्यातील शेतकरी सभासदांना माहीत आहे, यासंदर्भात शेतकरी बांधव यांना व सर्व नेत्यांना त्यांच्या समक्ष व त्यांच्या सहकार्याने कारखाना अडचणीतून काढण्याचा

प्रयत्न करणार आहे. विनंती खासदारकी, आमदारकी किंवा इतर राजकीय विषय काढु नका अशी माहिती मोहिते पाटील यांनी दिली. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप,माजी आमदार नारायण पाटील, विलासराव घुमरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले होते.

