करमाळा प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था करमाळा व ज्ञानज्योती महिला ग्रुप करमाळा यांच्या वतीने मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचे

प्रमाणपत्र वाटप व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या वतीने सलग अकरा वर्षे विद्यार्थिनींना शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेहंदी यासारख्या रोजगारासाठी

स्किल देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेचे अध्यक्ष निशिगंधा शेंडे करतात. कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्यान ठेवणे महिलांनी एकमेकांशी संवाद साधने तालुक्यातील कर्तुत्वान महिलांना व्यासपीठावर बोलवून सन्मानित

करणे असे कामे संस्था करते आजपर्यंत 2000 महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचे काम या संस्थेने केले आहे. या कार्यक्रमाच्या वेळी शितलताई वाघमारे यांच्या व्याख्यानातून प्रत्येकाला आपला मुलगा शिवबा व्हावे असे वाटते

पण शिवबाच्या घरातील आई जिजाऊ बनते त्याच घरात शिवबा जन्माला येतो ही गोष्ट विसरून चालणार नाही त्यामुळे प्रत्येक आईने राष्ट्रमाता जिजाऊ चा आदर्श घेऊन आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत असे आवाहन शितलताई वाघमारे

यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्यिका अंजली श्रीवास्तव होत्या. यावेळी डॉक्टर कविता कांबळे, माधुरीताई परदेशी, नोबेल स्कूलच्या संस्थापिका एलिताबेज असादे मॅडम, यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील, मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर सर, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष एडवोकेट बाबुराव हिरडे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्थेचे अध्यक्ष निशिगंधा शेंडे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर कविता कांबळे, गणेश करे पाटील, श्रीवास्तव मॅडम, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षणा अभियान संस्थेचे सचिव नम्रता शेंडे जाधव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आयोजन अनिता राऊत मॅडम, निशिगंधा शेंडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता राऊत मॅडम यांनी केले. यावेळी ज्ञानज्योती महिला ग्रुपचे सदस्य महिला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेचे महिला सदस्य व संस्थापक अनिल शेंडे, विक्रम राऊत सर, रवींद्र जाधव व इतर मान्यवर हजर होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *