
करमाळा प्रतिनिधी
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी शिष्टमंडळ घेऊन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेतली जनतेच्या हिताच्या मागण्या केल्या तहसील कचेरीमध्ये कुणबी दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याचा

बोर्ड लावावा, पुरवठा विभागामध्ये रेशन कार्ड संबंधीत कामे तत्काळ होण्यासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर ची संख्या वाढवावी, शेती संबंधीत सातबारा दुरुस्ती व इतर कामांच्या (फायली) प्रस्ताव तहसील कचेरीत पडून राहतात मात्र कामे वेळेत होत नाहीत,

कस्टडी मधील आरोपींना नातेवाईकांना भेटण्यासाठी जेलर कडे अर्जाद्वारे मागणी केल्यास तत्काळ परवानगी मिळावी अशा विविध मागण्या केल्या. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कुणबी दाखला

काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा बोर्ड ताबडतोब लावण्यास सांगितले, लवकरच पुरवठा विभागामध्ये रेशन कार्ड साठी दोन कॉम्प्युटर ऑपरेटर ची व्यवस्था करत आहोत असे सांगितले, सातबारा दुरुस्तीचे प्रस्ताव व शेतीसंबंधीत इतर फाइली

दोनशे नव्वद प्रकरणे आहेत ते मी स्वतः काढले आहेत लवकरच कामे होऊन जातील, कस्टडीतील आरोपींना भेटणे हा नातेवाईकांचा अधिकार आहे यापुढे अर्ज देऊन नातेवाईकांना भेट घेता येईल. अशा प्रकारे तहसीलदार मॅडम यांनी सर्व समस्या

सोडवल्याने शिष्ट मंडळ समाधानी झाले. या सर्व मागण्या या पूर्वी निवेदन देऊन केल्या होत्या आज परत पाठपुरावा केला. सुनील पोळ शेटफळ, संदीप मारकड पाटील उमरड, वरकटनेचे सरपंच गणेश घोरपडे, संजय तनपुरे वरकटने, पत्रकार विशाल घोलप, पत्रकार अण्णा काळे, आदीजण उपस्तित होते.

