करमाळा प्रतिनिधी

शिषिर बिल्डिंगचा बांधकामाचा बोगस पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याबाबतचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना संबंधित रहिवाशांनी दिले आहे यामध्ये असे म्हटले आहे की, करमाळा ग्रामीण मधील न्यु करमाळा टाऊन

शिप येथील गट नं. २२३/१/क/४ येथील शिशिर बिल्डींग नं. ३ चे क्षेत्र ४.१२० स्वे. मी. ही मिळकत माऊली बिल्डकॉन यांनी विकसित केलेली आहे व करीत आहेत. सदर मिळकतीवरील मे. श्री. माऊली बिल्डकॉन तर्फे भागीदार, दिनेश देविदास घोलप

( मो. नं. ९८२२००१५६६), सुरेश लक्ष्मण घाडगे पाटील (मो. नं. ९४२३३२६७७३) यांनी शिशिर बिल्डींग नं. ३ यानावाने बिल्डींग नकाशा मंजुर करून इमारत बांधण्याचे काम सुरू करून त्यातील निवासी सदनिका वेगवेगळ्या ग्राहकांना विकलेल्या आहेत.

सदर निवासी प्रकल्प हा रेरा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असून रेरा नं. पी.- ५२६०००२१५१० असा आहे. तसेच बिल्डींगचे कामही आज तारीख ०८/०१/२०२४ पर्यंत देखील अपूर्ण आहे. तरीसुध्दा यांनी उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुडूवाडी

यांचेकडून जामा बंदी कावि / ३०५/२०२२० अन्वये भोगवटा प्रमाणपत्र दि. १५/०२/२०२२ रोजी घेतलेले आहे. कामे अपूर्ण असताना देखील अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर पूर्णत्वाचा दाखला दिला याची चौकशी होवून संबंधित अधिकारी यांचेवर

कारवाई करावी व माऊली बिल्डकॉन पार्टनर यांना आम्ही वारंवार मुदत देवून देखील त्यांनी काम पूर्ण केले नाही. आम्हांला नोटरी करून दिलती त्याची मुदत देखील संपली आहे.

तरी आम्ही दि. २६/०१/२०२४ गणतंत्र या दिवशी आपल्या कार्यालयासमोर वरील सर्व आम्ही उपोषणास बसण्यास परवानगी द्यावी. असे निवेदन संबंधित रहिवाशी अभिजित वाघमोडे, विजय केंडे, किरण शेंदरकर, प्रताप वळेकर, गणेश कोकाटे, बालाजी तुंदारे, दत्तात्रय गायकवाड, शुभम सुपेकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे.  

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *