
करमाळा प्रतिनिधी
मातंग एकता आंदोलन महाराष्ट्राचे संस्थापक माजी गृहराज्य मंत्री रमेश दादा बागवे व पुणे मनपा नगरसेवक कार्याध्यक्ष अविनाश सर बागवे यांच्या आदेशानुसार तर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका अध्यक्ष

शरद भैय्या पवार, युवक तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण तर शहर अध्यक्ष युवराज जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा शहरात नुकतीच मातंग एकता आंदोलन संघटनेची बैठक पार पडली. असता बैठकीची सुरुवात प्रथमता महामानव

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करमाळा शहर विभागप्रमुख पदी नरेंद्र पवार व शहर युवक उपाध्यक्ष पदी गणेश आडसुळ यांची निवड. करमाळा येथे मातंग एकता

आंदोलनची बैठक बोलावून निवडीचे पत्र जेष्ठ नेते आबाजी मंडलिक व अजिनाथ आलाट मातंग एकता जिल्हाउपाध्यक्ष रतन शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस पप्पू मंडलिक, अमोल करंडे, अभिजीत मंडलिक,

विश्वराज आलाट, सोनू करंडे, शुभम करंडे यावेळी मान्यवरांचे मातंग एकता आंदोलन चे अध्यक्ष नितीन आलाट यांनी आभार मानले.