
करमाळा प्रतिनिधी
खेळाडूंच्या पाठीशी बिले परिवार उभा राहणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशन सहसचिव व आंतराष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमारे सर, योद्धा करिअर अकॅडमी चे संचालक गिते सर, संस्था संचालिका डॉ. स्वाती बिले आदी उपस्थित होते.

मौजे झरे ता. करमाळा येथे जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल येथे क्रीडा सप्ताह चे निमित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पांडुरंग वाघमारे सर यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

यावेळी वाघमारे सर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा कारण खेळणे हा मुलांचा नैसर्गिक अधिकार असून खेळाने शरीराचा व मनाचा विकास होतो. तसेच शरीराचे स्वास्थ ठिकून राहाते असे शेवटी वाघमारे सर यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. स्वाती बिले यांनी केले तर आभार प्राचार्य खराडे सर यांनी केले.


