
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखाना या कारखान्याने गेल्या ऊस गळीत हंगामाची बिले अद्याप दिलेली नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. ऊस नेऊन दहा ते अकरा महिने झाले आहेत. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे सण पोळा, महालक्ष्मी, गणपती, दसरा असे कितीतरी सन गेले आणि आता दिवाळी तोंडावर आली असताना देखील शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नसतील

तर प्राध्यापक राजेश गायकवाड यांनी श्री आदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे 31/10/2023 रोजी आमरण उपोषण करणार आहेत. त्यास घारगाव ग्रामपंचायत च्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत अशी माहिती घारगावच्या विद्यमान सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

यावेळी बोलताना सरवदे यांनी सांगितले की, तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आहे, लोकांना काम नाही, रोजगार उपलब्ध नाही. हक्काचे ऊस मकाईला घातलेला आहे तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. खरोखरच शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या सर्व कारणास्तव प्राध्यापक राजेश गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यांच्या उपोषणास आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत.
