
“भारत डाळ” योजनेतर्गत पोथरेत स्वस्तात हरभरा डाळीचे वाटप
करमाळा प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व नाफेडच्या “भारत डाळ” योजनेद्वारे येथे प्रतिव्यक्ती ५ की,हरभरा डाळ फक्त ६० रु दराने वाटप देशभरात सुरु आहे. याचाच भाग म्हणून पोथरेत “भारत डाळ” योजनेतर्गत हरभरा डाळीचे वाटप सुरु असलेची माहिती भाजपचे नितीन झिंजाडे यांनी दिली. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, पोथरे गावासाठी पहिल्या

टप्प्यात ३ टन डाळ जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेशभाऊ चिवटे यांच्यामुळे उपलब्ध झाली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, ग्रा.सदस्य विठ्ठल(भाऊ) शिंदे, मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे, विविध कार्य.सोसायटीचे चेअरमन आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते डाळीचे वाटप करण्यात आले. ऐन साणासूदीच्या तोंडावर बाजारभावापेक्षा कमी २५-३० रु प्रतिकिलो नागरिकांचे पैसे वाचले आहेत. सर्वांना डाळ मिळेपर्यंत वाटपाचे टप्पे होणार आहेत. यामुळे आमच्या गावातील नागरिकांचे लाखो रु. वाचणार आहेत. साऱ्या राज्याचा, देशाचा विचार केला तर ही रक्कम कैक कोटी रुपयांचा शासनाने लोकांना दिलासा दिला आहे. सुशासन व लोकांना मदत

करण्याची भूमिका यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पावर यांचे लोक आभार मानत आहेत.यावेळी अप्पा खटके,यमाजी झिंजाडे, यशवंत झिंजाडे,जालिंदर जाधव,गणेश वाळुंजकर,आबासाहेब चव्हाण,यशवंत झिंजाडे यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.