सोलापूर, (जिमाका), दि. 12 –   सयुंक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार राज्यस्तर आणि ‍जिल्हास्तर दर वर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. राज्य शासनाने दिनांक 8 सप्टेंबर 2017 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करुन दरवर्षी सर्व जिल्हयांमध्ये व राज्य पातळीवर दिनांक 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणुन साजरा करण्याबाबत तसेच सर्व जिल्हयांमध्ये या दिवशी रंगीत तालीम घेण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण नवी दिल्ली (NDMA) यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासंदर्भात सन 2003 या वर्षी प्रतिज्ञा तयार केली असून ती खालील प्रमाणे आहे.

प्रतिज्ञा

मी प्रतिज्ञा करतो / करते की, शासनाच्या आपत्ती सौम्यी करण्याच्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून आपत्ती पासून माझी,माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन, आपत्तीय धोके कमी करणाऱ्या समुदाय आधारित उपक्रमामध्ये मी सक्रिय सहभाग घेईल. माझ्या परिवारात व समाजात आपत्ती बदल जनजागृती करुन त्यासंबधी पूर्व तयारी कशी करावी याविषयी सदैव प्रयत्न करीन, राज्यातील आपत्ती प्रमाण भागात जिवित, वित्त व पर्यावरण विषयक हानी होऊ नये म्हणून, मी सदैव कटिबध्द राहीन, तरी ही प्रतिज्ञा आपल्या कार्यालयात व आपले अधिनस्त सर्व कार्याीलयात सकाळी 11 वाजता घेण्यात यावी असे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कळविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *