
जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्यावर अजून किती प्रवाशांचे बळी घेणार –भा.ज.पा. चिटणीस विनोद महानवर
करमाळा प्रतिनिधी
जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्यावर अजून किती प्रवाशांचे बळी घेणार असा सवाल करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांना विचारला आहे. सोलापूर जिल्हा भा.ज.पा. चिटणीस विनोद महानवर यांनी जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्यावर

शेकडोच्या वर प्रवाशांचे प्राण गेलेले आहेत. कित्येक प्रवाशांचे हात पाय गमावलेले आहे. कित्येक वारकऱ्यांनी आपले प्राण या रस्त्यावर सोडलेले आहेत. तरीही या प्रशासनाला जाग येत नाही. उबाळे सार्वजनिक बांधकाम विभाग हे आठवडी बाजारासारखे करमाळा ऑफिसला येत आहेत. आठवड्यातून एक दिवस ऑफिसला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील

रस्त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यातरस्ते का रस्त्यात खड्डे आहे हे समजत नाही. जर आठ दिवसांमध्ये करमाळा तालुक्यातील रस्त्यामध्ये जे खड्डे पडलेले आहेत ते जर खड्डे न बुजवल्यास करमाळा नगर रोडवर गोशाळेच्या जवळ त्या खड्ड्यामध्ये बसून बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा महानवर यांनी दिला.
