
भारत जोडो अभियान सोलापूर जिल्हा बैठक होणार आहे – अँड सविता शिंदे
करमाळा प्रतिनिधी
भारत जोडो अभियान ही प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी आणि समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुरू केली आहे. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना दूर करून शिव-शाहू- फुले-आंबेडकर-अहिल्या-सावित्री यांच्या विचारांची सत्ता आणणे हा प्रमुख उद्देश आहे. देशामध्ये सध्या संविधान आणि त्यातील अधिकार नाहीसे करण्याचा घाट घातला आहे. नव्याने पुन्हा मनुस्मृति लागू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढली आहे. अल्पसंख्यांक दलीत आदिवासी वरील हिंसा

वाढली आहे. धर्म आणि जातीयतेच्या नावाने हिंसा वाढली आहे. देशाची सामाजिक सुरक्षा, एकता आणि सलोखा असुरक्षित झाला आहे. या सर्व बाबीचा विचार करून जळगाव येथे दिनांक 1व 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांचे कार्यकर्ते एकत्र येऊन राज्यव्यापी कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानंतर मतदार संघ निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाले आहेत. कार्यकर्त्यांना विविध विषयावर प्रशिक्षित करणे, मतदारसंघाचे मॅपिंग करणे, मतदार जागृती करणे इत्यादी कामे सुरू झाली आहेत. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तसेच कार्यकर्त्यांना या भारत जोडो अभियानशी जोडण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत सगुना मंगल कार्यालय तांदूळवाडी तालुका माळशिरस येथे आयोजित करण्यात आली आहे.
आपण सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे ही विनंती.

सदर बैठकी नंतर संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत महिला कार्यकर्त्यांची वर्तमान सामाजिक व राजकीय स्थितीतीतील व भारत जोडो अभियानातील भूमिका या विषयावर स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. महिला कार्यकर्त्यांनीही अवश्य उपस्थित रहावे.
दिनांक व वेळ:10 ऑक्टोबर 2023. सकाळी 10 ते 5
स्थळ: सगुणा मंगल कार्यालय, तांदुळवाडी ता. माळशिरस (सदर मंगल कार्यालय हे सोलापूर सातारा हायवे वरील साळमुख फाट्या जवळून 1.5 किमी अंतरावर आहे)
आपले साथी

ललित बाबर, शोभा करांडे, एड. सविता शिंदे, निशा भोसले, नाथन केंगार, नंदू मोरे,
अधिक माहितीसाठी: ललित बाबर 9869441507/ शोभा करांडे 9422013588