
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा या पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

पतसंस्थेचे चेअरमन दयानंद चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सर्वसाधारण सभेचे उद्घाटन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करेपाटील सर यांच्या हस्ते झाले तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब होते.

या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेच्या वतीने 30 गुणवंत विद्यार्थी,राज्य,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान व 19 शाळांना, आदर्श शाळा पुरस्कार, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पतसंस्थेचे चेअरमन दयानंद चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत,अहवातील सर्व विषयांना सर्व सभासदांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात मंजुरी घेतली. या पुढेही संस्थेचा कारभार सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेवून पारदर्शी नीटनेटका करू व संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत नेवू अशा विश्वास व्यक्त केला.
पतसंस्थेचे संस्थापक शिक्षक नेते प्रताप काळे सर व सचिव देवेंद्र जाधवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचा चाललेला पारदर्शी कारभार हा सहकार क्षेत्रात दिशादर्शक ठरेल असे मत यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करेपाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास विविध पतसंस्थेचे चेअरमन, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, बहुसंख्येने सभासद,विद्यार्थी,पालक व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक प्रताप काळे यांनी केले. सूत्र संचालन अनिल यादव सर यांनी केले,तर उपस्थित सर्व मान्यवर,विद्यार्थी,पालक व सभासदांचे आभार संचालक.चंद्रहास चोरमले सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा सविता करंडे मॅडम,सचिव देवेंद्र जाधवर सर,संचालक उमेश कानडे सर, अशोक दुधे सर सर, अजिनाथ तोरमल सर, सखाराम राऊत सर, सयाजीराजे ओंभासे सर, सोमनाथ शिंदे सर, विजयालक्ष्मी राऊत मॅडम, जरीना तांबोळी मॅडम यांनी परिश्रम घेतले.