
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या योजनेचा लाभ घ्यावा – गटविकास अधिकारी मनोज राऊत
जेआरडी माझा
सोलापूर येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अंतर्गत दि. 20 सप्टेंबर 2023 रोजी सोलापूर येथे आयोजित केलेली आहे अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिलेली आहे.

आपल्या ग्रामपंचायतच्या अधिनस्त 5% दिव्यांग लाभार्थी यांना खालील योजनेचा लाभ देण्याबाबत आयोजन केलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी नोंद केले नसेल तर त्या लाभार्थ्यांनी उद्या दि. 19/9/2023 रोजी 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीस नोंद करावी. उद्या नोंदणी करण्यास अडचण असेल तर सोलापूर येथील मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी करण्यात येईल. दिव्यांग कल्याण कार्यक्रम सोलापूर येथे जाण्यासाठी 20/09/2023 रोजी सकाळी 7 वाजता ग्रामपंचायतीस उपस्थित राहावे. दिव्यांग कल्याण लाभार्थ्यांनी उपस्थित ठेवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने त्याची व्यवस्था केलेली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिलेली आहे.
