
करमाळा तालुका ओ.बी.सी.संघटनेच्या अध्यक्ष पदी तांबोळी
करमाळा प्रतिनिधी

ओ बी सी ऑर्गनायजन च्या तालुका अध्यक्ष पदी अमीर हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांची निवड झाली असुन या निवडीचे पत्र ऑल इंडिया ओ.बी.सी. ऑर्गनायजनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी आज निवडीचे पत्र दिले.

आमीर तांबोळी यांनी कोवीड च्या काळात अनेक गरजुना शिधा वाटप केला तसेच मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले असुन चुलते पुणे शहर कांग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी व

वडील नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी काम करत असुन या कामाची दखल घेऊन तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे.

