
करमाळा प्रतिनिधी
दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शेटफळ (ना) ता. करमाळा येथे प्रविणदादा गायकवाड (प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) यांनी करमाळा दौऱ्यावर असताना भेट दिली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन महाराजांचे विचार व प्रेरणा घ्यावी सर्व ग्रामस्थांचे दादांनी कौतुक केले.

तसेच प्रविणदादा गायकवाड यांचा ग्रामपंचायत कार्यालयात सुहास पोळ (तालुकाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड करमाळा) यांनी सत्कार केला. नुतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार प्रविणदादा गायकवाड यांनी केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवी दिशा नवा विचार घेऊन जे काही काम आम्ही करत आहोत त्याची समाजाला अत्यंत गरज आहे अहद आस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूख आपला या वाक्याचा वापर करून जगभरामध्ये उद्योग व्यवसाय नोकरीच्या भरपूर संधी आहेत तसेच आपल्या तरुणांनी राजकारण, धार्मिक विषय, क्रिकेट, सिरियल अशा वायफळ विषयावर चर्चा करण्यात आपला वेळ वाया घालवू नये, डोक्यात छत्रपती शिवराय आणि खिशात गांधीजी असेल तर जगात तुम्हाला किंमत आहे. त्यामुळे तरूणांनी आपल्या अर्थकारणावर भर द्यावा, महागाई वाढल्याने सर्व सामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. देशात 80 कोटी लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यामुळे तरूणांनी कसलाही उद्योग व्यवसाय नोकरी करावी आरक्षणाचा लढा चालूच ठेऊन आता आपल्याला आता आरक्षणाकडून अर्थकारणाकडे जावे लागणार आहे, प्रविणदादांनी अतिशय परखड भाषेमध्ये सर्वच ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले व प्रविणदादांनी आमच्या गावाला वेळात वेळ काढून भेट दिल्यामुळे सर्वच ग्रामस्थांकडून दादांचे कौतुक करण्यात आले.

शेटफळचा कार्यक्रम झाल्यावर प्रविणदादा गायकवाड यांनी नितीन खटके यांच्या निवासस्थानी सदिछा भेट व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व नंतर करमाळा येथे जिजाऊ नगर मध्ये रायगड लॉन्स & मंगल कार्यालय येथे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.

यावेळी संजय चौधरी (प्राध्यापक), संजय गुटाळ (प्रशासकीय संचालक आदिनाथ कारखाना), नितीन खटके (संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष), सचिन काळे (तालुकाध्यक्ष – मराठा सेवा संघ), दादासाहेब लबडे (संचालक कृ. उ. बा. समिती), मनोहर पोळ (चेअरमन नागनाथ दुध संस्था), नागेश झांजुर्णे, सुहास पोळ (तालुकाध्यक्ष करमाळा), बंडू अवसरे, नवनाथ खबाले, बाळासाहेब तोरमल (जिल्हा संघटक), अतुल निर्मळ (शहराध्यक्ष जेऊर), पांडुरंग लबडे (सरपंच), शिवाजी पोळ (उपसरपंच), विकास गुंड (मा.सरपंच), आनंद नाईकनवरे, भाऊसाहेब साबळे (चेअरमन वि. वि. का. से. सो.), सचिन पोळ (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), तुकाराम चोरगे, बळीराम पोळ, काका गुंड, आजिनाथ कळसाईत, आनंद गायकवाड, सुधीर पोळ, विशाल पोळ, सचिन पोळ, राजेंद्र पोळ, नाना पोळ, अशोक पोळ, अर्जुन नाईकनवरे, पिंटु जाधव, अजित उपादे, बाळासाहेब झोळ, राहुल लबडे, पारस गुंड, प्रदीप पोळ, बापूराव पोळ, रणजित लबडे, रेवननाथ पोळ, गणेश नाईकनवरे, नितीन धेंडे, संजय लबडे, बापू लबडे, राजेंद्र साबळे, बबन सरकाळे, राजेंद्र गुंड, विनोद गोरे, दिनेश वाघमारे, सोमनाथ गुंड, धनाजी गायकवाड, अनिल जाधव, इत्यादी उपस्थित होते.