करमाळा प्रतिनिधी  

सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या सोलापूर जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेमध्ये कोंढारचिंचोलीच्या ऋतुजा कांबळे आणि प्रदीप भुई यांनी दुहेरी यश संपादन केले आहे.

इंडियन ॲथलेटिक्स असोसिएशन शी संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन सोरेगाव कॅम्प येथे केले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध भागातून खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग

घेतला होता. कोंढार चिंचोली येथील धावपटू राष्ट्रीय धावपटू ऋतुजा कांबळे हिने 20 वर्षाखालील मुलींच्या गटात 5000 मीटर धावण्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर 3000 मीटर स्टीफलचेस या प्रकारात जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक

पटकावला. त्याचप्रमाणे प्रदीप भुई यानेही 18 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या गटात 2000 मीटर स्टीफलचेस धावणे या प्रकारात प्रथम क्रमांक तर 800 मीटर धावणे या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. हे दोघेही खेळाडू या दोन्ही प्रकारांमध्ये

मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातून हे खेळाडू मोठ्या जिद्दीने मेहनत घेऊन या स्पर्धा गाजवत आहेत. त्यांना खातगाव नंबर 2 जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक बाळासाहेब बोडखे यांचे निर्णायक मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

ऋतुजा आणि प्रदीप यांच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चेतन धनवडे, सोलापूर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू प्याटी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार,  सतीश गुरव यांनी ऋतुजा कांबळे,  प्रदीप भुई व त्यांना मार्गदर्शन करणारे बाळासाहेब बोडखे यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *