करमाळा प्रतिनिधी

संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त दिं. 11 रोजी  सोमवारी संत सेना नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संत सेना मंदिरात पुण्यतिथीनिमित्त जामखेडचे विवेकानंद मंदरतकर महाराज यांचे किर्तन भजन होणार आहे. दुपारी १२:००

वा. प्रतिमेवर फुले वाहण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नाभिक बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे. तसेच इतर नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष नारायण तात्या पवार यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *