जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबेत स्थलांतरित करण्याचे आदेश….
गणेश झोळ.
संचालक मकाई सहकारी साखर

प्रतिनिधी वाशिंबे.
जेऊर ता.करमाळा येथे ग्रामीण रुग्णालय झाले असल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे ता.करमाळा येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी

मागणी मकाईचे संचालक गणेश झोळ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.

यावेळी दिलेल्या निवेदनात झोळ यांनी करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वाशिंबे,सोगाव,केतूर१,केतूर२,गोयेगाव,उंदरगाव,मांजरगाव,
रीटेवाडी,राजुरी,पारेवाडी,हींगणी ही गावे तालुक्याच्या

ठिकाणापासून दूर असून या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध नाही.रात्री अपरात्री आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाल्यास नागरीकांना करमाळा अथवा बारामती येथे उपचारासाठी जावे

लागते.वेळेत उपचाराअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.या बाबींचा विचार करता.जेऊर ता करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे Just स्थलांतरीत करण्याची मागणी केली.या मागणीची

सकारात्मक दखल घेत डाँ.तानाजी सावंत,प्रा.शिवाजी सावंत यांनी संबधित अधिकार्यांना प्रा. आ. केंद्र स्थलांतरीत करण्याते आदेश दिले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *