
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील सारंगकर डेंटल क्लिनिक चे डॉ. चंद्रकांत सारंगकर व डॉ. निशा सारंगकर यांच्या डेंटल सिटी स्कॅन व अत्याधुनिक डेंटल हॉस्पिटल चे उदघाटन मॅनेजिंग डायरेक्टर व मेडिकल डायरेक्टर UAIMS हॉस्पिटल सांगली चे डॉ. मिलिंद

पारीख व डॉ. संजय कोग्रेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी करमाळा परिसर व शहरातील तसेच अकलूज, पंढरपूर, नगर, पुणे, कोल्हापूर येथून आलेले त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स, नातेवाईक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी असे सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आपल्या जिल्ह्यात व परिसरात डॉ. सारंगकर यांनी जी आपल्या 22 वर्ष्यांच्या दंत वैद्यकीय सेवे मध्ये प्रगती केली आहे ते सर्वाना पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारची अत्याधुनिक सेवा तालुक्याच्या ठिकाणी पेशंट ला मिळावी व त्याचा त्यांना लाभ

व्हावा अशी प्रतिक्रिया डॉ. चंद्रकांत व डॉ. निशा सारंगकर यांनी व्यक्त केली. यासाठी असणारे अत्याधुनिक असे डेंटल सिटी स्कॅन,अत्याधुनिक जंतू नासकीकरण विभाग, डिजिटल स्कॅनर, लेसर त्यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिला

असून अशी सर्व उपचार एकाच छताखाली सेवा देणारे त्यांचे ग्रामीण महाराष्ट्रातले पहिले हॉस्पिटल आहे. 4 डेंटल चेअर चा सेट अप असून 4 पूर्ण वेळ काम करणारे दंत रोग तज्ज्ञ व 3 व्हिजिटिंग डेंटल सर्जन उपलब्ध आहेत. लहान मुलांचा विभाग, अत्याधुनिक रूट कॅनॉल, दंत रोपण व लेझर विभाग आहेत.

या सर्व उपचारांचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले व सर्वांचे आभार मानले.