
कुर्डूवाडी प्रतिनिधी
भारताच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भोसरे गावातील परंडा रोड लगत असलेल्या जय हिंद नगर मध्ये गट नंबर 58 / 2 येथे मुख्य रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. भोसरी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच स्वाती नीलकंठ

कुंभार, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्या मुन्नाबी याकुब बागवान, ग्रामपंचायत सदस्या पुनम अमोल खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी स्थानिक सचिन आलट, प्रकाश दळवी, शिवाजी शिंगाडे, पांडुरंग दळवी ,सचिन थिटे, ऋषिकेश कुंभार, आनंद गायकवाड, सत्यवान हांडे, महेश केदार, नागनाथ गोरड, सागर शिंदे, संजय कोळी व शहाजी पारेकर आदि नागरिकांनी वृक्षारोपण करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला.


