
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेच्या दहीगाव पंपिंग स्टेशन येथे गेल्या आठ दिवसापासुन वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे करमाळा शहरातील पाणी पुरवठा विष्कळीत झाला असुन या बाबत जेऊर वीज उपकेंद्र येथे नगरसेवक संजय सावंत पाणी

पुरवठा अधिकारी फिरोज शेख, माजी नगरसेवक फारुक जमादार, राजेन्द्र सुर्यवंशी, पांडुरंग सावंत, आजीनाथ वीर, नितिन माने, आदी जणांनी भेट दिली असता त्याठिकाणी जेऊर वीज उपकेंद्राचे अधिकारी भोईर व काळे यांनी सांगीतले की, वारा

पाऊसामुळे लाईन ट्रिप होऊन सप्लाय बंद होत होता त्यामुळे दहीगाव पंपिंग स्टेशन येथे पुर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता परंतु सावंत यांनी सांगीतले की, दहीगाव पंपिंग स्टेशन येथे सन १९९३ साली एक्सप्रेस फिडर लाईन १९९३ साली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी स्वखर्चाने एक्सप्रेस फिडर बसविलेला आहे. सदर लाईन वर इतर खाजगी शेतकरी खाजगी कंपनीस वीज कनेक्शन कायद्याने देता येत नाही असे समजते. या एक्सप्रेस फिडर लाईन वर अनेक जणांनी कनेक्शन

घेतलेले असल्याचे समजते आणी त्यामुळेच सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. सदर नगरपालिकेच्या दहीगाव येथील पंपिंग स्टेशन ला चोवीस तास वीज पुरवठा केला तरच करमाळा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो त्यामुळे जेऊर वीज

उपकेंद्राने दहीगाव पंपिंग स्टेशन येथे चौवीस तास वीज पुरवठा करावा व इतर खाजगी कनेक्शन बंद करण्यात यावे किंवा दहीगाव सब स्टेशन वरुन कनेक्शन देण्यात यावे तसेच यापुढे जर विज पुरवठा खंडीत झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले.