
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने भारत देशाचे भाग्यविधाते, यशस्वी, कणखर पंतप्रधान नरेंदजी मोदी साहेब यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे आयोजन पोथरे येथे आनंदी लॉन्स मंगल कार्यालयात करण्यात आले होते.

यानंतर सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी यांनी स्वतःच्या घरून जेवणाचे डबे आणले होते व सर्वांनी मिळून एकत्र स्नेहभोजन केले.

यावेळी उपस्थित लोकांना भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी मार्गदर्शन करताना टिफिन बैठकीचे महत्त्व सांगितले व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर टिफिन बैठका आयोजित करण्यात येत आहे. आपल्याही तालुक्यात प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी टिफिन बैठकीचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे मोहन शिंदे, किरण बागल,बिटरगाव चे सरपंच डॉ.अभिजित मुरूमकर, बाळासाहेब होसिंग, नितीन झिंजाडे, यशवंत झिंजाडे, आप्पा खटके, गणेश वाळुंजकर, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे, मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, संतोष वाळुंजकर, दादा झिंजाडे, योगेश रंदवे, सुभाष शिंदे, नवनाथ नाळे, दादासाहेब शिंदे, दादा झिंजाडे, नवनाथ झिंजाडे, धनंजय झिंजाडे, शामराव झिंजाडे, नामदेव शिंदे, सोमनाथ नंदरगे, विनोद शिंदे, शिवाजी रोही, शहाजी शिंदे, विनोद शिंदे, महादेव गोसावी, भूषण नलवडे, विनोद इंदलकर, दगडू गोसावी, यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
