करमाळा तालुक्यातील मागील वर्षी अतिवृष्टी अनुदान वाटपात करमाळा व कोर्टी मंडळावर अन्याय राज्य सरकारने घेतला युटर्न

करमाळा प्रतिनिधी

सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम आठ हजार पाचशे वरून 13500 एवढी वाढवली होती. तसेच बागायती पिकांसाठी अठरा हजार पाचशे वरून सत्तावीस हजार पाचशे एवढी वाढवली होती. तशी घोषणाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केली होती व त्यानुसार गेल्या एक-दोन महिन्यात

करमाळा तालुक्यातील सर्व मंडळात सुधारित दराने तीन हेक्टर मर्यादेपर्यंत अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत कोर्टी व करमाळा मंडळामध्ये सदर अनुदान वितरित करण्यात आले नव्हते. सात जुलै रोजी निधीची उपलब्ध नसल्याकारणाने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आदेश काढून जुन्या दराने कोर्टी व करमाळा मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान

वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे व तसा आदेश ही निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांनी काढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असून अगोदरच पाऊस लांबल्यामुळे पेरण्या नाहीत. मागील वर्षे दहा महिने झालं अनुदान नाही व सध्या जे काही उपलब्ध होणार आहे ते अनुदानही जुन्याच दराने असल्याकारणाने विलंब

होऊनही शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात याचा अन्याय सहन करावा लागणार आहे. तरी शासनास विनंती आहे की याबाबत तातडीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन सुधारित दराने इतर तालुक्यात व मंडळात दिल्या जाणाऱ्या दरानेच शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकरी बांधवातून करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *