मकाईचे माजी संचालक संतोष देशमुख यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी,

बागल गटाचे समर्थक तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष आप्पा देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू व हसतमुख अशा स्वभावाचे संतोष देशमुख हे अचानक निघून गेल्याने पूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे. बागल

गटाला विजय मिळावा यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू होते. त्यात प्रमुख कामगिरी आप्पा निभावत होते. वांगी परिसरात उत्कृष्ट समाजकार्य करत असलेला नेता म्हणून ओळख निर्माण केलेले संतोष आप्पा देशमुख हे अचानक निघून जातील असे वाटत नसताना झालेली घटना मनाला चटका लावून जाणारी आहे.

 जवळपास मकाईत बागल गटाचे एकतर्फी सत्ता आलेली असताना ज्या सत्तेसाठी त्यांनी प्रयत्न केले याचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच त्यांची ही एक्झिट नक्कीच सर्वांना मोठा झटका देणारी ठरणार आहे. हसतमुख सभावाने कायम प्रत्येकाच्या

हृदयात घर करणाऱ्या आप्पांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *