ओबीसींची जातवार जनगणना, महाज्योतीचे विभागीय कार्यालय, विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शिष्यवृती आदीं प्रश्नी मुख्यमंत्री यांना निवेदन देणार – ओबीसी जनमोर्चा बैठकीत निर्णय

करमाळा प्रतिनिधी

ओबीसी जनमोर्चा आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसीं समाज पदाधिकारी व सक्रिय ओबीसी कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १)महाराष्ट्रातील ओबीसींची जातवार जनगणना सर्वेक्षण करणेसाठी ४३५ कोटींचा

निधी मागासवर्ग आयोगास तातडीने द्या.  २) ओबीसींच्या प्रगतीची महाज्योती संस्थेचे विभागीय कार्यालय तातडीने कोल्हापूरला सुरू करा.  ३) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता प्रतिवर्षी ६० हजार रू. द्यावा. ४) ओबीसी

विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार वसतीगृहे तातडीने सुरू करावीत. ५) BBA, BCS या कोर्सेसना स्काँलरशिप / फ्रीशिप सुरू करा. ओबीसी वित्त आणि विकास महामंडळास तातडीने १००० कोटी निधी द्या. या मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर जिल्हा मुख्याद्यापक संघ सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *