
जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या चुकीच्या झालेल्या प्लॅन इस्टिमेटमध्ये बदल करण्याची मागणी: शितलताई क्षिरसागर
करमाळा प्रतिनिधी,
पांडे येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या प्लॅन इस्टिमेटमध्ये बदल करून गावात नवीन पाण्याची टाकी घेण्याची मागणी पांडे ग्रामपंचायत सदस्या शितलताई क्षिरसागर यांनी जिल्हाधिकारी

तथा पाणीपुरवठा अध्यक्ष सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर यांना निवेदनाद्वारे कळवले आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे पांडे गावची लोकसंख्या 3500 ते 4000 असून गावात पाण्याची एकच टाकी आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा दिवसाआड करुनही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे गावात पाण्याची टंचाई दरवर्षी भासत असते जनावरांचाही पाण्याचा प्रश्न गंभीर होतो म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचा फक्त पाईपलाईन

व नळ कनेक्शन देऊन पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. योजनेचे चालू असलेले काम रद्द करून मूळ गावात दुसरी नवीन टाकी घेण्यात यावी. वाड्या वस्त्यांवर पाण्याची आवश्यकता आहे परंतु ज्या ठिकाणी टाकी घेण्यात आली नाही. त्या ठिकाणी योग्य चौकशी करून टाकी घ्यावी जेणेकरून वस्तीवरील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल याचा विचार करून बोरवेल ला चांगले पाणी

लागले. तरच योजना राबवावी असेही शितलताई क्षीरसागर यांनी सांगितले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. चुकीच्या पद्धतीने लोकसंख्येचा आधार न घेता ग्रामपंचायत मधील काही सदस्य पाणीपुरवठा अभियंता व ग्रामसेवक यांनी एजन्सीला हाताशी धरून व महिला सदस्यांना विचारात न घेता चुकीच्या पद्धतीने प्लॅन इस्टिमेट तयार करून स्वतःच्या शेतात महिला

सरपंच पती यांनी हस्तक्षेप करून झोन तीन अनारसे वस्ती व ग्रामपंचायत सदस्य झोन दोन संदिपान दुधे वस्ती यांनी स्वतःच्या शेतात पाणी टाक्या घेतल्या असून झोन दोन येथे बोअरला पाणी लागलेले नसताना काम चालू केलेले आहे. त्यामुळे या योजनेचा नागरिकांना उपयोग होणार नाही म्हणून निंबाह्य चालू असणाऱ्या योजनेची योग्य चौकशी करून सात

दिवसाच्या आत अंमलबजावणी करावी अन्यथा सोलापूर येथे दिनांक 25 /5/ 2023 रोजी अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन ग्रामपंचायत सदस्या क्षीरसागर यांनी दिले आहे..